ठळक बातम्या

राहुरीतील त्या कांदा व्यापार्याचा परवाना रद्द करा: मनसेची मागणी

राहुरी/मधुकर म्हसे : येथील कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची कांदा लिलावात फसवणूक केल्याने या कांदा व्यापार्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.


राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डुक्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत ह्या व्यापाऱ्याने किती तरी गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल, हे घडलेल्या घटनेतुन सिद्ध झाले आहे. अगोदरच शेतकरी अनेक संकटाशी लढून जिवन जगत आहे. त्यात अशा व्यपाऱ्याकडून होणारी लूट म्हणजे टाळू वरचं लोणी खाण्यासारखी गत आहे.

अशा भ्रष्ट व्यापार्यावर चाप बसवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवत व्यापार्यांचा परवाना रद्द करण्यात यावा व त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी केली आहे. येत्या ८ दिवसात व्यापाऱ्यावर कारवाई व परवाना रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, शहराध्यक्ष प्रतिक विधाते, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर माने, वाहतूक सेनेचे राजू आढागळे व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button