अहमदनगर

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सौ. व्यवहारे

राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील वांबोरी येथील सौ. जयश्री बबन व्यवहारे यांची नुकतीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सौ. व्यवहारे यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. शारदाताई बाळासाहेब खुळे यांच्या स्वाक्षरीने, प्रदेश अध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते व राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.


सौ. व्यवहारे यांनी श्री संत सावता माळी युवक संघाचे वांबोरी शहराध्यक्ष पदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे. त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहे. या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Back to top button