अहमदनगर

राज ठाकरेंच्या कोरोना मुक्तीसाठी संगमनेर मनसेचे गणरायाला साकडे…!

संगमनेर/बाळासाहेब भोर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर कोरोनातुन मुक्त व्हावेत यासाठी संगमनेर मनसेच्या वतीने जागृत देवस्थान समनापूरच्या गणपतीला साकडे घालण्यात आले.
यावेळी गणरायाची महाआरती करून राज ठाकरेंची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न कोणताही असो तो राज ठाकरेंच्या दरबारात गेला कि लगेच निकाली लागतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक युवक आज राज ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आहेत.
याप्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किशोर डोके, संगमनेर विद्यार्थी सेना अध्यक्ष संकेत लोंढे, शहराध्यक्ष अभिजित कुलकर्णी, दर्शन वाकचौरे, दीपक वर्पे, संदीप आव्हाड, अविनाश भोर, ज्ञानेश्वर नाईकवाडी, आकाश अडांगळे, सागर सोनवणे, गिरीश उमाप, मनोज दातीर, प्रमोद काळे, सुरज तळेकर, व इतर मनसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button