ठळक बातम्या

भारताची अर्थव्यवस्था जगात ११ वरून ५ व्या क्रमांकावर – ना.प्रल्हादसिंह पटेल

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारताची अर्थव्यवस्था जगात ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आली असल्याचे अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार चे केंद्रीय राज्य मंत्री ना.प्रल्हादसिंह पटेल यांनी श्रीरामपूर स्वयंवर मंगल कार्यालय येथे प्रतिपादन केले.
केंद्रीय राज्यमंत्री ना. पटेल पुढे बोलताना म्हणाले की, सांसद प्रवास योजना हा मोदीजींचा प्रभाव आहे. या आधी कधी केंद्रीय मंत्री यांनी असा प्रकारचा सांसद प्रवास योजना कधी केलेला आढळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न मागता ज्या योजनांचा लाभ ज्यांना मिळाला त्यांचे मनोगत ऐकायचे होते. २०१६ मध्ये त्यांनी विचार केला होता भारताचे स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर भारत कसा असावा ? असा विचार केला होता. त्यांनी विचार केला की गरिबांच्या घरी वीज, गॅस, संपन्नता, वैद्यकीय सेवा याचा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून जल जीवन मिशनची घोषणा केली. प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पाणी पोहोचविणे, सबका साथ, सबका विकास सबका विश्वास, हे धोरण ठरविले. केंद्राच्या सर्व योजना कोणत्याही जातीच्या, धर्माच्या आधारावर, पक्षाच्या आधारावर केल्या नाहीत. दुसरे धोरण होते की, जी योजनाची तारीख आहे त्यापूर्वी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्यांना अनेक योजनाचा लाभ झाला त्यांनी मोदीजी यांना पत्र लिहिले का? २०३० पर्यंत ६० टक्के महिलांना रोजगार दिला तर भारताला आर्थिक दृष्ट्या उंचीवर नेऊ शकतो.
इपीएस ९५ पेन्शनर्स यांचे विषयी सांगितले की, वयोवृद्ध यांची समस्या आहे, त्यासाठी नवे रस्ते शोधावे लागेल, २०१४ मध्ये भारताची जगात अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. आता ती पाचव्या क्रमांकावर आली व ब्रिटनला ५ वरून ६ वर ढकलले. त्यांनी भारतावर २५० वर्षे राज्य केले. लिज्जत पापड सारख्या कंपनीने नाव कमविले. दोन लाख लघु उद्योजकांना पाच वर्षामध्ये १० हजार कोटी रु देणार आहे. घर, गॅस मिळाल्याने आपली चिंता मिटली आहे. वेळेची बचत झाली. त्यामुळे परिवाराला खुशाल बनवावे व देशाच्या प्रगतीसाठी योगदान करावे. आपल्याला जादा मिळणाऱ्या पाण्याचा दुरुपयोग करू नये, कोरोना काळाला सप्टेंबर मध्ये २८ महिने पूर्ण होतील. त्याकाळात नागरिकांना मोफत लसीकरण केले. १५० देशाला भारताने लस पुरविली. ८० करोड नागरिकांना मोफत रेशन धान्य दिले व पुन्हा डिसेंबर अखेरपर्यंत मोफत धान्य मिळणार आहे. आपल्याला लोकसभा प्रवास योजनेची जाणीव झाली पाहिजे. मी लाभार्थींचे मनोगत ऐकायला आलो होतो. त्यांचा आज सन्मान केला. सामान्य व्यक्ती या संकल्पनेचा धारक होऊ शकतो. प्रधानमंत्री एकाचा विचार न करता सर्वांचा करतात. २०३० या वर्षापर्यंत आपली अर्थव्यवस्था २ अथवा ३ ऱ्या क्रमांकावर आली पाहिजे असे मोदी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. आजच्या संवादाचे हेच मुख्य कारण आहे, ज्यामुळे देश प्रगतीपथावर जाईल.
याप्रसंगी महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकार पुरस्कृत सुविधा योजनेच्या लाभार्थींची संवादाचा कार्यक्रम आज ना.पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. ते केंद्रीय मंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशात ८४ योजना सुरु केल्या. त्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, लाभार्थ्यांना किती लाभ होतो. काय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज संवाद परिषद आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा साजरा करीत आहोत. सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्याची राहील. पक्षाच्या धोरणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. देश एकसंघ करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करीत आहेत. केंद्राने शिक्षणापासून आरोग्यापर्यंत व शेतकरी ते जवानापर्यंत प्रत्येकाला योजना दिली. प्रास्तविक स्वागत भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी केले. यावेळी लोकसभा प्रवास योजनाचे प्रभारी आ.राहुल आहेर, प्रदेश कार्यकारिणीचे रविजी अनासपुरे, जिल्हाधिकरी राजेंद्र भोसले, आ.चंद्रशेखर कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सुनील वाणी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, सभापती नाना शिंदे, शरद नवले, योगीराज परदेशी, गणेशराव मुदगुले, श्रीमती धुमाळ, रिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन गणेशराव मुदगुले यांनी केले.

Related Articles

Back to top button