अहमदनगर

हरिगाव येथे विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीत संत जॉन व्हियानी स्मृतिदिन साजरा

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : संत तेरेजा चर्च हरिगाव येथे संत जॉन व्हियांनी यांचा स्मृतिदिन विविध धर्मगुरु यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.प्रमुख अतिथी रे फा,ज्यो गायकवाड यांनी संत जॉन व्हियानी यांच्या जीवनचरित्राबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की जोन व्हियानी एक फ्रेंच संत होते. त्यांचा जन्म ८ मे १७८६ या वर्षी दार्डीली फ्रांस येथे झाला. त्यांनी अवघ्या १३ व्या वर्षी ख्रिस्त प्रसाद घेतला व वडिलांनी घर सोडण्यास व शिक्षण घेण्यास परवानगी दिली. पण फ्रेंच क्रांतीमुळे शिक्षण घेण्यास अडथळां निर्माण झाला. परमेश्वरावरील श्रद्धा, त्यागी जीवन सार्थमय जीवन या जोरावर त्यांनी सेमिनरीचा अभ्यास पूर्ण केला. त्यांचे आई वडील देवाला मानणारे होते भक्ती करणारे होते.व.सन १८१५ मध्ये सहाय्यक धर्मगुरू व १८१८ या वर्षी एका लहान खेड्यात धर्मगुरू झाले. त्या गावात देवाला मानणारे लोक नव्हते. तेथे जाऊन विश्वास निर्माण करावा, म्हणून तेथे पाठविण्यात आले.
त्यांनी आजारी लोकांना भेटण्यास सुरुवात केली, भिकारी लोकांची भेट घेतली, अनाथ मुलींसाठी आश्रम सुरु केले.आपल्या धर्मग्रामात लोकांचे परिवर्तन कसे करावे, देवाची भक्ती कशी निर्माण करावी,असा विचार केला.ते चर्चमध्ये तासनतास बसायचे,प्रार्थना करायचे त्यावर ते केवळ थांबले नाहीत. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यामुळे परमेश्वराने तपश्चर्येला बळ दिले. त्यांनी सर्व गावाचे परिवर्तन केले. त्यांची कीर्ती आजूबाजूला पसरू लागली. फक्त फ्रांस देशात नव्हे तर युरोप देशात,इतर देशात त्यांचे कार्य दिसले. त्याचे मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक धर्मगुरू भेटले. या संताला आपला वेळ कमी पडू लागला. ते शेवटपर्यंत निस्पृह,सात्विक होते. त्यागमय जीवन जगायचे,खूप कमी जेवण करायचे,फार कमी झोप घ्यायचे.१८२५ या वर्षी पोप यांनी संतपद बहाल केले.त्यांचे कार्य महान आहे.तसेच आपल्या ख्रिस्तसभेत आईवडिलांनी आपल्या मुलांना या मार्गावर येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.चांगले करिअर करण्यासाठी प्रयत्न करावेत.
आपल्या मुलांना ख्रिस्तसभेत प्रभूच्या मायेमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.४ ऑगस्ट रोजी आपण त्यांचा फिस्ट साजरा करीत असतो.त्यांचा मृत्यू ४ ऑगस्ट १८४९ रोजी झाला. आजच्या संत जॉन व्हियानी फिस्ट कार्यक्रमात व्हिकर जनरल नासिक वसंत सोज्वळ,प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे,ज्यो गायकवाड,सचिन मुन्तोडे, डॉमनिक, रिचर्ड, जितेंद्र जाधव, सायमन शिणगारे, आनंद बोधक आदी धर्मगुरू सहभागी होते. या सर्व धर्मगुरूंच्या हस्ते चर्च आवारात भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याचे जलकुंभाचा, मतमाउली पवित्र वस्तू भांडार तसेच भक्त निवास आदींचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. शासकीय आदेश पाळून या कार्यक्रमाचे भाविकांना घरबसल्या प्रसारमाध्यमांद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. येत्या १४ ऑगस्ट रोजी रे फा.सचिन मुन्तोडे यांचे सहाव्या नोव्हेना शनिवारी प्रवचन होणार आहे.

Related Articles

Back to top button