अहमदनगर

राज्यमंत्री तनपुरे यांचा वांबोरीत भव्य जनता दरबार

जनता दरबारात पूर्तता केलेल्या रेशनकार्डची प्रत दिव्यांग महिलेला सुपूर्द करताना नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे…

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात आज शनिवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या दरबारात नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला तर काही प्रलंबित प्रश्नांना संबंधित विभागाला तातडीचे निर्देश देत समस्याचे निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. मागील वेळी जनता दरबारात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यात आली. एका दिव्यांग महिलेने रेशनकार्ड मिळावे यासाठी निवेदन दिले होते. त्याची पूर्तता दरबारात करत नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे स्वतः रेशन कार्डची प्रत घेऊन आले व त्यांना सुपूर्द केली.

यावेळी झालेल्या दरबारात मंत्री तनपुरे यांनी सांगितले की जनसामान्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्यावर उपाय योजनात्मक कार्यवाही करणे यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रियतेने काम करत आहे. आजही वांबोरी येथील वहिवाट रस्ते, घरकुल योजना, अन्न धान्य कुपन, निराधार योजना, विविध दाखले व महावितरणच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. समस्या लहान असो की मोठी ती मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. या खेपेला सुमारे २०० च्या वर निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि समाधानाने घरी परतले. यात आनंद व्यक्त केल्याचे अधिक समाधान लाभले असल्याचे नमूद केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, एकनाथ ढवळे, किसन जवरे, सुरेश बाफना, माजी उपसरपंच ऋषिकेश मोरे, भागवतराव पागिरे, बंटी वेताळ, तहसीलदार फसीउद्दीन शेख, मंत्री तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक किरणकुमार काकडे, अमोल गुलदगड उपस्थित होते.

Related Articles

Back to top button