सामाजिक

राज्यमंत्री तनपुरेंच्या हस्ते दिव्यांगांना वैश्विक कार्डचे वितरण

राहुरी प्रतिनिधी : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर व राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना वैश्विक कार्डचे वाटप ना. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. राहुरी तालुक्यात सुमारे 800 युनिक कार्ड प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले. उर्वरित दिव्यांगांचे वैश्विक कार्ड आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात मिळेल. राहुरी शहरातील युनिक कार्ड मिनी आय टी आय कॉलेज रोड राहुरी येथे मिळेल. केंद्र शासनाच्या मिळणाऱ्या वैश्विक (युनिक कार्ड) चा उपयोग भविष्यात शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ या कार्ड मार्फत मिळणार आहे. दिव्यांगांची ओळख पत्र म्हणून या कार्ड चा उपयोग होणार आहे तसेच या कार्डला आधारकार्ड लिंक असणार आहे अशी माहिती राहुरी तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिली.

ज्याप्रमाणे ना. बच्चूभाऊ कडू दिव्यांगासाठी काम करतात त्याचप्रमाणे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दिव्यांगांसाठी मोठे योगदान देत आहे. दिव्यांगांसाठी नगरपालिकाचा 5% निधी प्राधान्याने देतात. राहुरीतील दिव्यांगांसाठी प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे . यावेळी जिल्हा संघटक आप्पासाहेब ढोकणे, सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, मराठा महासंघाचे शिवाजी डौले, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, राहुरीचे प्रथम नागरिक अनिल कासार, दिव्यांग प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, जिल्हा ध्यक्ष अशोकराव तुपे, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अतुल तनपुरे, आदिनाथ तनपुरे, मच्छिंद्र गुलदगड, यशवंतराव डावखर, सुनील  गुलदगड, जगन्नाथ सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे बोलताना म्हणाले की, सावता महाराजांचे कार्य महाराष्ट्र राज्यासाठी कायम प्रेरणादायी आहे.कौतुकास्पद बाब आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने देखील दिव्यांगांसाठी सर्वतोपरी कायम सहकार्य करू अशी ग्वाही दिली. यावेळी नगरसेविका सौ संगीता ताई आहेर, समूह संघटक कु .सुनंदा दहातोंडे,  अशोक आहेर, प्रहार संघटना तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सचिव योगेश लबडे, संपर्क प्रमुख रवी भुजडी, देवळाली शहराध्यक्ष सलीम शेख, राहुरी शहराध्यक्ष वैभव थोरात, वांबोरी शाखा अध्यक्ष शशिकांत कुरे, काळे दत्तात्रय खेमनार, सुखदेव कीर्तने, दवणे, जीवन गुलदगड, दिलीपराव आघाव, पत्रकार बंधू व दिव्यांग प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार मधुकर घाडगे यांनी मानले.

Related Articles

Back to top button