औरंगाबाद

राजु चव्हाण यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

फोटो : राजु चव्हाण यांना निवडीचे पत्र देताना माजी आमदार संजय वाघचौरे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणेसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते.

विलास लाटे /पैठण : पैठण तालुक्यातील जांभळीवाडी येथील राजु टिलुसिंग चव्हाण यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे माजी आमदार संजय वाघचौरे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन ही निवड करण्यात आली.
पक्षाच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून पक्ष बळकटीसाठी व मजबुतीसाठी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित तालुका उपाध्यक्ष चव्हाण यांनी दिली. यावेळी विलास भैय्या शेळके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल वाघचौरे, सरपंच ज्ञानेश्वर कागदे, श्रीकांत तरमळे, विनोद तोष्णीवाल, गणेश काळे, अमोल जाधव, तेजस नागे, शुभम छडीदार, रामेश्वर लघाने, विठ्ठल लघाने, सुनिल चव्हाण, अनिल चव्हाण, अंकुश चव्हाण, संदीप चव्हाण, विजु चव्हाण, राजु चव्हाण, राजेश राठोड, पवन चव्हाण, गणेश चव्हाण, गणेश राठोड, नितेश चव्हाण, अजय राठोड, सतिश चव्हाण आदींची उपस्थिती होती. त्यांच्या या निवडीचे सर्व मित्रमंडळी व नातेवाईकांतून अभिनंदन केले जात आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button