पश्चिम महाराष्ट्र

रझा अकादमी वर तत्काळ बंदी घाला; माजी सैनिक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इथून पूढे शहीद स्मारकाची विटंबना केल्यास जशाच तसे उत्तर देऊ – शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के
पुणे : शैक्षणिक संघटनेचा बुरखा पांघरुन दहशद माजवत ११ ऑगस्ट २०१२ मध्येही मुंबई येथील आझाद मैदानातील “अमर जवान ज्योतीची” तोड़फोड करून विटंबना करणारी, महिला पोलिसांना धक्का बुक्का करणारी व त्रिपुरात न घडलेले प्रकरणावरुन देशात विशेषताः महाराष्ट्रात दंगली घडवणाऱ्या चिथावणीखोर रझा अकादमीवर तत्काळ बंदी घालावी अशी जोरदार मागणी माजी सैनिक संघटनेने श्रमिक पत्रकार संघ पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे येथील पत्रकार परिषदेत कर्नल सुरेश पाटील, सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, शंभुसेना प्रदेश सरचिटणीस व सैनिक फेडरेशन पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्यासह संघटनेच्या अनेक सैनिकांनी आपली मते मांडली. रझा अकादमी या दंगेखोर संघटनेने यापूर्वीही अनेक दंगे घडवले असुन महाराष्ट्र राज्यात तर नुकत्याच दंगली पेटावल्या असल्याने वेळीच अशा वादग्रस्त संघटनांवर बंदी घातली पाहिजे असे सडेतोड मत कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के बोलताना म्हणाले की, सर्व जाती धर्म गुण्या-गोविंदाने (हिंदुस्थान) भारत देशात एकत्र नांदत असुन विनाकारण जर कोण देशांतर्गत शांतता भंग करत असतील तर माजी सैनिक संघटना स्वस्थ बसणार नाही. आम्ही भारतीय सैन्यदलात असताना देशाची सेवा करण्यापूर्वी जी शपथ घेतली ती अजूनही विसरलो नाही, अमर जवान स्मारकाची जर कोण तोडफोड, विटंबना करत आहेत तसेच दंगली भडकावत असतील तर वेळप्रसंगी माजी सैनिक बंदूक चालवणे ही विसरला नाही. तत्पूर्वीच संबंधित दोन्ही सरकारने वादग्रस्त संघटनेवर बंदी घालावी अशी विनंती राजेशिर्के यांनी केली आहे.
संबधित मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे शिवाय लोकसभेत चर्चा होण्याच्या दृष्टिने राज्यसभा खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे ही ग्रीन थंबचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील, शंभुसेना संघटना प्रमुख व सैनिक फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपकराजे शिर्के, सैनिक फेडरेशन कार्याध्यक्ष व बीजेपी सैनिक प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष मा. नारायण अंकुशे तसेच शंभुसेना प्रदेश सरचिटणीस व सैनिक फेडरेशन पुणे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जाधव, कॅप्टन परशुराम शिंदे, संजय नाळे, जेष्ठ माजी सैनिक भामे, विठ्ठल नानेकर आदी माजी सैनिकांसह असंख्य माजी सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button