अहमदनगर

मुळा नदीवरील दोन पूल पाण्याखाली

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : मुळा धरणातून मोठ्या प्रमाणात मुळानदी पात्रात पाणी सोडण्यात आल्याने राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापुर, पिंप्री, कोंढवड, शिलेगांव या गावांचा पुल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.

भविष्यात या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे अशी मागणी येथील प्रवासी वर्गातून केली जात आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुळा नदीपात्रात सकाळी ६ हजार १५० क्‍युसेकने विसर्ग मुळा धरणातून मुळानदी पात्रात सोडण्यात आला होता. पुन्हा नदी पात्रात विसर्ग ८ हजार ६८० क्युसेक करण्यात आला. त्यामुळे नदी पलीकडे गांवानां मुळा नदीपात्रातील आरडगांव ते केंदळ व तांदुळवाडी ते कोंढवडसह इतर गांवाचा पुल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.

येथील गावांतील प्रवासी शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, दोन चाकी व चार चाकी वाहतूक करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे शासनाने पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी येथील प्रवासी वर्गातून केली जात आहे.

Related Articles

Back to top button