अहमदनगर

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक

राहुरी प्रतिनिधी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत असून धरणात नव्याने पाणीसाठा जमा होऊ लागला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक मोठे व २६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात आज गुरुवारी १४ हजार २०५ दशलक्ष घनफूट पाण्याचा साठा जमा झाला आहे. अजूनही धरणात ६ हजार २६० क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती.गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठयाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले असून उर्वरित पावसाळी हंगामात धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडेल असे बोलले जात आहे. हरिश्चंद्रगड कोतुळ या भागातून प्रामुख्याने मुळा धरणात पाणी जमा होत असते.तेथील पावसावरच धरणातील पाण्याचे भवितव्य अवलंबून असते घाटमाथ्यावर पावसाच्या प्रमाणात पाण्याची आवक येते. पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखाधिकारी आण्णासाहेब आंधळे हे सातत्याने संपर्क साधत नवीन पाण्याच्या बाबतीत लक्ष ठेवून आहेत.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button