कृषी
मुळा डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडा : पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी
आरडगाव/ राजेंद्र आढाव :
उभी पिके जळून चालल्याने शेतीसाठी मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे व लाभधारक शेतकऱ्यांनी केले आहे. पावसाने दडी मारल्याने शेती पिकांसह जनावरांचे चारा पिके जळून चालली आहे. मुळाधरण सुमारे १६ हजार ओलांडले असल्याने तसेच महावितरणच्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे विहिरी व बोरवेल यावरील विजेच्या मोटारी चालत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाळुन चालले आहेत. पाण्याअभावी उस, घास, मका गिन्नीगवत या सारखी चारा पिके जळु लागली आहे. पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने शेतीसाठी लवकरात लवकर मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी डॉ तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, रवींद्र म्हसे, किशोर वने, माजी उपसभापती रवींद्र आढाव, पोपट जाधव, सरपंच आब्बासभाई शेख, निवृत्ती आढाव, कचरु आढाव, अण्णासाहेब ठुबे, नानासाहेब आढाव,दत्तात्रय खुळे, मधुकर पवार, ज्ञानदेव देठे, उत्तमराव खुळे, पोपट झुगे, किरण बोरावके, सतीश म्हसे, दिलीप म्हसे, संजय पोटे, दत्तात्रय म्हसे, प्रमोद बोरावके, बापूसाहेब धसाळ, प्रमोद झुगे यांनी केली आहे. मुळा डाव्या कालव्यात खालील तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.