अहमदनगर

माती आणी माता सुरक्षित होणे काळाची गरज – कैलास पवार

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माती आणि माता सुरक्षित होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रा कैलास पवार यांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस येथे केले.
सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या प्रेरणेतून आणि संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून स्थापित भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमातून साजरी करत “माती संवर्धन अभियान” आणि “युवकांना रोजगार अभियान” या दोन अभियानाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन केले. तसेच महात्मा गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे खेड्याकडे चला या वाक्याला स्मरणात ठेवून नायगाव येथील विधवा आणि निराधार महिलेला दोन शेळ्या देऊन संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून भूमी फाउंडेशनच्या वतीने मदत केली आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ गुंदेचा हे होते. या कार्यक्रम प्रसंगी एक मे महाराष्ट्र दिनी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कवी संमेलनात प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक प्राप्त कवींना सन्मानित करण्यात आले.भूमी फाउंडेशन ही संस्था महाराष्ट्रभर करत असलेल्या समाज उपयोगी कार्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून हे कार्य निश्चित उल्लेखनीय असून या संस्थेच्या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले आहे.
यावेळी उपस्थित प्राचार्य शंकरराव अनारसे, श्रीरामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक रमेशशेठ गुंदेचा, प्राचार्य टी इ शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, संपादक प्रकाश कुलथे, बालरोग तज्ञ डॉ.प्रकाश मेहकरकर, विश्व लक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सुखदेव सुकळे, एडवोकेट प्रशांत दोरडे, प्रा.शिवाजीराव बारगळ, कवी बाबासाहेब पवार, प्राध्यापक काळे, पत्रकार स्वामीराज कुलथे, महांकाळवडगाव माजी सरपंच कचरू महांकाळे, राहुल चोरमळ, भीमराज बागुल तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button