सामाजिक

माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी देत असलेले योगदान देशभक्तीचे प्रतिक -उपवनसंरक्षक सुवर्णाताई माने

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वृक्षरोपण

अहमदनगर (प्रतिनिधी)– आजी-माजी सैनिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरु केलेली चळवळ प्रेरणादायी आहे.डोंगर रांगा हिरवाईने फुलविण्यासाठी व वृक्षरोपण, संवर्धनासाठी माजी सैनिकांनी घेतलेल्या पुढाकाराची इतिहासात नोंद होईल. देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सामाजिक भावनेने माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी देत असलेले योगदान देशभक्तीचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णाताई माने यांनी केले. 
      माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.या अभियानाप्रसंगी माने बोलत होत्या.यावेळी आर.एफ.ओ.सुनिल थिटे,गावडे, कोल्हारचे सरपंच शिवाजीराव पालवे,विष्णू गिते पाटील, आजिनाथ पालवे, बाळासाहेब पालवे, सैनिक बचत गटाच्या अनिताताई नेटके, नवनाथ पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, वृक्षबँकेचे संचालक शिवाजी गर्जे, आत्माराम दहातोंडे, शिवाजी पठाडे, आयटीआयचे प्राचार्य सुनिल शिंदे, गणेश हडदगुणे, जालिंदर खाकाळ,रविंद्र पवार, अरूण गोंधळे, गजानन स्वामी, उत्तम ठोकळ, मंदा सुपेकर, सतिश भुसारी, भाऊसाहेब थोरात, संजय पांढारकर, प्रशांत आढे, महेंद्र गलांडे, धनंजय घोंगडे, भागिनाथ पगारे, वैशाली कुरापाटी, सौ.सातपुते, क्षेत्रे, कांबळे आदी उपस्थित होते.
     जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून नगर जिल्हात 625 वृक्षापासुन बनवलेले जागतिक पंचवृक्ष, 500 वडाची झाडे लावलेले गर्भगिरी वनराई, संपुर्ण गावातील दिवंगत व्यक्तीच्या नावे 1000 फळ झाडे लावलेले डोंगरी स्मृती उद्यान असे ऐतिहासिक वृक्षारोपण करुन माजी सैनिक या चळवळीत योगदान देत असल्याचे स्पष्ट केले. आयटीआयचे गणेश हडदगुणे यांनी वड हे राष्ट्रीय वृक्ष असून, त्याने वातावरणातील कार्बनडॉय ऑक्साईड कमी होऊन मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळते. वट वृक्षाप्रमाणे माजी सैनिकांचे सामाजिक कार्य बहरणार असल्याचे सांगून 25 वडाची झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्विकारली. सरपंच शिवाजी पालवे, प्राचार्य सुनिल शिंदे, आर.एफ.ओ. सुनिल थेटे यांनी माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले. आभार मेजर आत्माराम दहातोंडे यांनी मानले.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button