अहमदनगर

ग्रामीण भागातील कलाकार कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख

ग्रामीण भागातील कलाकारांचा जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते सत्कार
आरडगांव प्रतिनिधी राजेंद्र आढावग्रामीण भागातील कलाकार कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत नावलौकिक मिळत आहेत. हे कलाकार लवकरच छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर दिसावा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव ह्या कलाकारांनी महाराष्ट्रभर गाजावे असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांनी काढले आहे.

राहुरी तालुक्यातील कलाकारांच्या माध्यमातून लोकप्रिय होत चाललेली बाप लेकाची धमाल ह्या वेबसीरीज कलाकारांचा महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ना. गडाख म्हणाले की, खूप आनंद वाटतो धावत्या युगात पोटधरून हसायला लावणार्या ग्रामीण भागातील लोक कलावंतांनी कला जिवंत ठेवली, असे तोंड भरून कौतुक केले. या वेळी सिनेअभिनेता भाऊसाहेब पवार, साहेबराव तनपुरे, प्रसाद वाघ, शिवाय टेमक, रणजीत लहारे, माऊली पटारे आणि शिवसेना नेते सोपान पवार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button