ठळक बातम्या

माजी मंत्री तनपुरेंकडे मराठा एकीकरण समितीने केल्या विविध मागण्या

छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसविण्याबरोबर मराठा भवनासाठी जागा उपलब्ध करून द्या – मराठा एकीकरण समितीची मागणी
राहुरी – मराठा बहुउद्देशीय संस्था संचालित मराठा एकीकरण समितीने माजी मंत्री आ.प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा त्याचबरोबर मराठा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की, राहुरी शहराच्या बाजूला शिर्डी व शिंगणापूर हे प्रख्यात देवस्थान आहेत. देश विदेशातून येणारे भाविक-पर्यटक हे आपल्या राहुरी शहरातून प्रवास करत असतात. राहुरी शहरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा नाही. त्याच अनुषंगाने राहुरी नगर परिषदेने सुधारित पाणीपुरवठा योजने अंतर्गत नविन पाण्याची टाकी मुथा प्लॉट, डॉ.दादासाहेब तनपुरे मार्गावर बांधलेली आहे. जुनी जीर्ण झालेली पाण्याची टाकी निष्कासित करणे अनिवार्य झालेली आहे. त्या जीर्ण पाण्याच्या टाकीच्या जागेवर “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी केली. तसेच राहुरी शहरात मराठा भवन बांधण्यासाठी राहुरी शहरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. मराठा भवन मध्ये वाचनालय, ग्रंथालय, शासकीय योजनांचे अद्यावत सेंटर, तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. राहुरी नगरपरिषदेला देखील याच आशयाचे निवेदन देण्यात आले.

मराठा एकीकरण समितीचे शेकडो सदस्य विविध मागण्यांचे निवेदन घेवून दु.१२ वाजे दरम्यान आ.प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात धडकले. परंतु आ.तनपुरे हे त्यांच्या कार्यालयात व्यस्त असल्याने समितीच्या सदस्यांनी कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज कि जय, एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी सुरु केल्यामुळे स्वतः आ.तनपुरे यांनी कार्यालयाच्या बाहेर येत मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

या प्रसंगी राजेंद्र लबडे, सतीष घुले, किरण कडू, विराज धसाळ, सचिन म्हसे, रमेश म्हसे, निखील कोहकडे, दिनेश झावरे, सतीष चोथे, लक्ष्मण पटारे, सतीष ढोकणे, सुभाष जुंदरे, जनार्धन तारडे, सुनिल निमसे, कांता तनपुरे, सचिन चौधरी, सचिन बोरुडे, कावरे भाऊराव, आबासाहेब शेटे, शिवाजी थोरात, शिवाजी थोरात, रोहित नालकर, नितीन कल्हापुरे, अनिल आढाव, विक्रांत कडू, संदीप गीते, रोहित नालकर, अविनाश क्षीरसागर, विक्रम मोढे, विनायक बाठे, विक्रम गाढे, संदीप कावाने, दिपक पवार, सागर ताकटे, अमोल वाळूंज, दिघे आदिनाथ, रविंद्र कदम, अनिल निमसे आदींसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button