औरंगाबाद

माजी गुणवंत विद्यार्थी म्हणून विजय चिडे यांचा सत्कार

पाचोड : राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी असणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांपैकी तीन वर्ष चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पैठण तालुक्यातील पाचोड येथील शिवछत्रपती कला महाविद्यालयाच्या वतिने गुणवंत विद्यार्थी म्हणून माजी विद्यार्थी विजय चिडे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विजय बंडू चिडे हे (विद्यार्थी संसद सचिव 2020- 21, तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी 2020-21 तथा पत्रकार) यांनी बी.ए.प्रथम वर्षापासून ते तृतीय वर्षपूर्ण होई पर्यंत सतत राष्ट्रीय सेवा योजनेत सक्रीय राहुन महाविद्यालयामध्ये होणारे सर्व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडले आहे. नूकतेच चिडे यांनी तृतीय वर्षांचे शिक्षणपूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी दुसरीकडे प्रवेश घेतला आहे.

त्यामुळे महाविद्यालयाचे समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ.गांधी बानायत यांनी चिडे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गांधी यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांचा सत्कार करणे म्हणजे समाज ऋणाची परतफेड खऱ्या अर्थाने तेव्हाच होते. जेव्हा महाविद्यालयाचा विद्यार्थी एक दक्ष नागरिक म्हणून समाजात वावरतो व यासोबतच राष्ट्र उभारणीच्या कामी हातभार लावतो.

त्याच बरोबरच चिडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, राष्ट्रीय सेवा योजने मध्ये सहभागी झाल्यानंतर आपला समाजाकडे पाहण्याचा दुष्टीकोन बदलून आपल्यालाही शिक्षण घेत असता समाजसेवा करण्याची संधी भेटते. त्या बरोबरच मागील तीन वर्षात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्यावर प्रथम वर्ष लिमगाव येथे जावून “पाणी आडवा पाणी जिरवा” या मध्ये गावालगत असणाऱ्या पाण्याच्या ओढ्याच्या खोलीकरणासाठी श्रमदान करून तिथून वाहुन जाणाऱ्या पाण्याला आडवले तर दुसऱ्या वर्षी गावात स्वच्छता मोहीम राबून गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटून दिले तसेच त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला, त्याची आठवण करून दिली. महाविद्यालयाने दिलेल्या ज्ञान व संस्कार यांची अमूल्य शिदोरी भविष्यकालीन जीवनात एक सुजाण नागरिक म्हणून जगण्यास निश्चितपणे उपयोगी पडेल असे मनोगत व्यक्त केले आहे.

यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विलास महाजन, प्राचार्य सुरेश नलावडे, प्रा.डॉ.सुभाष पोटभरे, डॉ.हरिप्रसाद बिडवे, प्रा.विनोद कांबळे, प्रा. डॉ. शिवाजी यादव, प्रा.डॉ.भगवान जायभाये, प्रा. डॉ. संतोष चव्हाण, प्रा.डॉ. उत्तम जाधव, प्रा. तुकाराम गावंडे, प्रा.डॉ. विठ्ठल देखने, परवेज शेख सह आदी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button