कृषी

महोगनी वृक्ष लागवडीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत…क्रांतीसेनेचा आंदोलनाचा इशारा…

अहमदनगर जिल्ह्यात बहरत आहे महोगनी वृक्ष
श्रीगोंदा – अहमदनगर जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन एक व्यक्ती एक झाड अभियान राबवित असताना एकीकडे मात्र मग्रारोहयो अंतर्गत महोगनी वृक्ष लागवडीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.याबाबत शेतकर्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर यांची भेट घेत तक्रार केली होती.दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत आज गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना निवेदन देत शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा क्रांती सेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 
     सविस्तर वृत्त असे की, फेब्रुवारी महिन्यात मग्रारोहयोच्या समन्वयकांची बैठक जिल्हा परिषदेत झाली होती.महोगनी वृक्ष लागवडीच्या प्रस्तावावर चर्चा केली.परंतु आजतागायत प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर करावेत का नाही याबाबत कुठलिही कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांना कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली.वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन निर्णया अंतर्गत महोगणी वृक्ष लागवड इतर जिल्ह्यात कोणतेही जिल्हा अंतर्गत बैठक न घेता कार्यवाही चालू आहे.परंतु अहमदनगर जिल्हा परिषदेने शासन निर्णयास समांतर बैठक घेऊन प्रस्ताव थांबविणे हे नियमबाह्य आहे. शिवाय आज पर्यंत त्यावर कोणीही निर्णय न देणे ही बाब गंभीर आहे व जाणुनबुजून शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीचा फायदा मिळण्यास अडचण व अडथळा निर्माण केला आहे.वास्तविक जानेवारीपासून आलेल्या प्रस्तावावर आज पर्यंत कसलीही कार्यवाही संबंधितांनी केलेली नाही.त्यामुळे प्रस्ताव मंजुरी बाबत झालेली दिरंगाई व शेतकऱ्यांचे खड्ड्याचे मिळणारे रास लाभ यामुळे मिळाला नाही.या सर्व प्रकाराला जिल्हा परिषद समन्वयक हेच जबाबदार आहेत.शासनाच्या वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्याऐवजी लागवडीचे प्रस्ताव चार ते पाच महिने पडून आहेत.समन्वयकांनी आदेशाप्रमाणे प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया न करता अडचण निर्माण करून विलंब करून लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे.यामुळे शेतकऱ्यांनी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर यांना या प्रकरणाची माहिती देत यावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घातले.जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर व श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप डेबरे यांनी श्रीगोंदा गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button