अहमदनगर

महेश मुनोत विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : या वर्षी ७५ वा स्वातंत्र्य दिन देशभरात ‘आझादी का अमृत महोत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांच्या निस्सीम देशभक्तीचा नव्या पिढीला परिचय करून देण्याच्या उद्देशाने हा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
महेश मुनोत विद्यालयात यावेळी “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” फलकाचे अनावरण पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शेख मोबिन यांच्या हस्ते करण्यात आले. वांबोरीचे सरपंच किरण ससाणे, मोबिन शेख, विद्यालयाच्या प्राचार्या नितिशा चावरे, उपप्राचार्य भिमराज आव्हाड, पर्यवेक्षिका वंदना आरण्ये, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ मोटे, सूत्रसंचालन विष्णू गिरी यांनी तर आभार बाबासाहेब पटारे यांनी मानले.

Related Articles

Back to top button