कृषी

पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ यांची कृषि विद्यापीठास भेट

राहुरी विद्यापीठपाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकळ यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भेट दिली. यावेळी संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे स्वागत केले.


भटकळ यांनी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या समवेत विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. आंतरविद्या जलसिंचन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने यांनी सिंचन पार्कमध्ये पिकांच्या पाणी व्यवस्थापनासाठी आधुनिक सिंचन पध्दतींची माहिती त्यांनी दिली. कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी शेतकर्यांसाठी राबवत असलेल्या केंद्राच्या उपक्रमांची माहिती दिली. ज्वारी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक दुधाडे यांनी ज्वारी प्रकल्पावर सध्या होत असलेल्या ज्वारी पिकातील संशोधनाची माहिती दिली. ज्वारी सुधार प्रकल्पावर नुकतीच मा. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या सी.एस.एच.-47 या वाणाच्या प्रात्यक्षिक क्षेत्राला भेट दिली.


औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विक्रम जांभळे यांनी विविध औषधी वनस्पतींची माहिती दिली. डॉ. विनायक जोशी यांनी फळबाग लागवड पीक प्रात्यक्षिके आणि कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाच्या उपलब्धींची माहिती सादर केली. उद्यानविद्या रोपवाटीकेत आयोजीत प्रदर्शनात डॉ. सचिन मगर यांनी माहिती दिली.

डॉ. भटकळ यांना गो संशोधन व विकास प्रकल्पात विद्यापीठ निर्मित फुले भुमित्र या गांडूळ खताची माहिती डॉ. महेंंद्र मोटे यांनी दिली. कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके आणि डॉ. उल्हास सुर्वे यांनी विद्यापीठाच्या सेंद्रिय संशोधन प्रकल्पाची माहिती दिली. बांबु संशोधन प्रकल्पाची माहिती डॉ. बाबासाहेब सिनारे आणि डॉ. सुमती दिघे यांनी दिली.

या भेटीनंतर श्री. भटकळ यांनी विद्यापीठ कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली शेतकर्यांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल आणि संशोधनाबद्दल समाधन व्यक्त केले. तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांसाठी अधिक चांगले उपक्रम राबविण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला. या भेटीच्या वेळी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन उपस्थित होते.

Related Articles

Back to top button