अहमदनगर
महात्मा फुले कृषि विद्यापीठ मुलांच्या वस्तीगृहात आढळला अजगर
व्हिडीओ : म.फु.कृ. विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहात अजगर आढळला
राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : शनिवार दि. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ११ ते ११:३० च्या दरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या वसतिगृहात एक 5 ते 6 फूट लांबीचा अजगर आढळून येताच मोठी दहशत पसरली. मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अजगर आढळ्याची बातमी वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली.
व्हिडिओ : म.फु.कृ. विद्यापीठाच्या मुलांच्या वसतीगृहात अजगर आढळला
काही क्षणात 50 ते 60 विद्यार्थी जमा झाले, त्यावेळी विद्यापीठातील सर्पमित्र योगेश जाधव व सुरक्षा रक्षक हर्षल गुप्ता यांनी राहुरी शहरातील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना फोन करून कल्पना दिली असता कृष्णा पोपळघट व सर्पमित्र मुजीब देशमुख हे काही वेळातच घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या अजगराला सुखरूप पकडून ताब्यात घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात पोपळघट व देशमुख याचे आभार व्यक्त केले.