कृषी

सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी कृषि विज्ञान केंद्र मॉडेल व्हावे- कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना बोरगांव येथे अद्ययावत तंत्रज्ञान पाहण्यास मिळावे व त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. प्रगतशील शेतकर्यांना राष्ट्रीय स्तरावर विविध सन्मानासाठी प्रोत्साहित करुन तंत्रज्ञान प्रसार करावा. सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी बोरगाव येथील कृषि विज्ञान केंद्र मॉडेल व्हावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव व कृषि तंत्र विद्यालय, बोरगांव येथे सदिच्छा भेटी प्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी त्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व उपक्रमांची माहिती घेतली व प्रात्यक्षिकांची पाहणी केली. प्रक्षेत्रावरील पीक प्रात्यक्षिकाची पाहणी तसेच किचनगार्डनचे प्रात्यक्षिकाची पाहणी केली. रोपवाटीका, हळद व निशिगंध तसेच सघन पेरु लागवड, अंडी उबवणी, चारा पीक प्रात्यक्षिक इ. प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देवून तसेच मागील वर्षीच्या उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी मार्गदर्शक सुचना केल्या. 

     यावेळी कृषि तंत्र विद्यालय, बोरगांव येथे प्राचार्य प्रा. मोहन शिर्के यांनी कुलगुरु डॉ. पाटील यांचे स्वागत केले व सद्यपरिस्थीतीची माहिती दिली तसेच प्रक्षेत्रावरील सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमाची व शेळी प्रकल्प, गांडुळ खत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी कृषि विज्ञान केंद्रातील तसेच कृषि तंत्र विद्यालयातील सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button