कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये उद्योजकता व रोजगार क्षमता विकसीत करण्यासाठी वेबिनार संपन्न

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीजागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि माजी विद्यार्थी संघटना, डॉ.अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांची उद्योजकता व रोजगार क्षमता विकसीत करण्यासाठी वेबिनार मालिकेतील अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर दुसर्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते.यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, डॉ. हरि मोरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ. एन. जे. ठाकूर, प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार हे उपस्थित होते.  
    यावेळी वेबिनारचे निमंत्रक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी विषय तज्ञांचे व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सह निमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे यांनी वेबिनारची पाश्वभुमी विषद केली. वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक व तज्ञ हे माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य होते तसेच यशस्वी उद्योजक यांचा देखिल समावेश होता. या वेबिनासाठी प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील सेंट्रल इंस्टिटयुट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नोलॉजी, लुधियानाचे माजी संचालक डॉ. आर.टी. पाटील, सीएसआयआर-सीएफटीआरआय अनुसंधान म्हैसूरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजेश्वर मचे, सहयाद्री फार्मचे अध्यक्षीय व्यवस्थापक संचालक, इंजि. विलास शिंदे तसेच पुणे येथिल निहीरा फुड इंजिनिअरींगचे संस्थापक इंजि. संतोष कार्ले, इत्यादिंनी प्रक्रिया उद्योगातील नाविण्यपूर्ण संधी, आव्हाने, बागायती क्षेत्रातील संधी, मार्ग आणि आव्हाने तसेच प्रक्रिया उद्योगातील स्टार्टप/आरंभ इत्यादि विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या वेबिनारचे आयोजक डॉ. विक्रम कड, सहयोगी प्राध्यापक, कृषि अभियांत्रिकी, मफुकृवि, राहुरी तसेच ईस्ट ग्रेन प्रो इंडिया पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी कंपनीचे मॅनेजर इंजि. एस. सी. पाटील हे सहआयोजक होते. डॉ. हरि मोरे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले तर सुत्रसंचालन डॉ. नंदलाल देशमुख यांनी केले. या वेबिनारचे समन्वयक म्हणून डॉ. नंदलाल देशमुख आणि डॉ. शुभांगी घाडगे यांनी काम पाहिले. या वेबिनारसाठी ३९८ पेक्षा अधिक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक व शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Back to top button