अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात हर घर तिरंगा रॅली संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्याद्वारे हर घर तिरंगा जागृती रॅली विद्यापीठ परिसरात काढण्यात आली होती.
या रॅलीला सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी मार्गदर्शन केले. रॅलीची सुुरुवात डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या पुतळ्यापासुन झाली. पुढे कुलगुरु निवास स्थानासमोरुन अधिकारी, कर्मचारी वसाहतीमधून फिरुन परत महाविद्यालयात आली. रॅलीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांचा सहभाग होता. रॅलीचे नियोजन डॉ. कैलास कांबळे आणि डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी केले.

Related Articles

Back to top button