अहमदनगर

गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर चे स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांमध्ये विद्यालयाला रंगकामासाठी देणाऱ्या दातृत्ववान पालकांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी अप्पर पोलीस अधीक्षक स्वातीताई भोर, विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी तथा श्रीरामपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, श्रीरामपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, टाकळीभान साईनाथ दूध संकलन केंद्राचे पृथ्वीराज उंदरे तसेच ह.भ.प. सेवा नाथ गुरु चौरंगीनाथ महाराज, गोरक्षनाथ देवस्थान मठाधिपती, खोकर, खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव जयंतराव चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हंसराज आदिक, ज्येष्ठ गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भाऊसाहेब पाटील लवांडे, नितीन पवार, सुनिल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन पोपटराव जाधव पाटील यांनी भूषविले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी खाजेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमातून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
विद्यालयातील किशोर कवडे, सौ. संगीता राऊत, संगीता फासाटे, संजय साळवे, संतोष कवडे, दीपक आदिक, सुनील पानसरे, हेमलता बोरुडे, अश्विनी यादव, प्रियंका खराडे, अनिता डोळस इत्यादी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी विद्यार्थी संघटना खोकरच्या वतीने विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी मयूर गव्हाणे यांने सत्कार निवेदन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती संगीता फासाटेे, किशोर कवडेे, संजय साळवे यांनी सूत्रसंचालन केले. राज्य गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Back to top button