अहमदनगर

महांकाळ वाडगाव ग्रामपंचायत ग्रामसभा खेळीमेळीत

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : सोमवार दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी महांकाळ वाडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच सौ.सुवर्णा राहुल चोरमळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते‌. सुरुवातीला ना. प्राजक्त तनपुरे यांच्या अभिनंदनचा ठराव उपसरपंच नवनाथ वसंतराव पवार यांनी मांडला. महांकाळ वाडगाव लिंक लाईन मंजूर करण्यासाठी त्यांनी विशेष मदत केली.

आजच्या सभेत ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे अभिनंदन, विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. गिरणाल नाल्याचे उर्वरित खोलीकरण, आमचा गाव आमचा विकास 2021-22 आराखडा, जल जीवन योजना नियोजन, तंटामुक्ती अध्यक्ष निवड, समृद्धी मजूर बजेट, वरील विषयावर सखोल चर्चा नागरिकांसमोर झाली. एकंदरीत पाहता ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कुठल्याही भेदभाव वादविवाद न होता पार पडली. सदर ग्रामसभेला गावातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी सदर ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button