प्रासंगिक

भु-छत्र, त्याची उपमा आणि वास्तव

गावाबाहेर असल्याने गेली दोन तीन दिवस गांवगाडा सदर लिहले नाही. गावातील घडामोडी तश्या आजकाल फोनाफोनी व सोशल मिडियावर समजत असतात. त्यामुळे गांवगाडा कसा चाललाय हे समजत असतेच. मुंबई पुणे प्रवास करताना पावसाचा चांगलाच जोर जाणवला. गांवी चौकशी केली तर तिकडेहि पाऊस सुरु असल्याचे समजले. इकडे टॅफिक जाम तर गावी सोयाबीन काढणीचे टेन्शन. दोन वेगळे विषय असले तरी ताणतणाव येतोच. वरुणराजा किती कोसळणार यांचा अंदाज काही येईना. धरणे तुडुंब, ओढे, नाले, नद्या दुधडी भरुन वाहत आहेत. विहिरी बोअरवेल गच्च भरलेल्या तर शेतात तळे. असं काही चित्र सर्वत्र दिसत आहे. सगळी संकंटाची मालिका.

दोन तीन दिवसाचे दौ-यात गावगाड्यातुन बाहेर पडत जीवलग, आप्तेष्टांच्या भेटीगाठी खुप सुखदायक. कोरोनाने तर वाट लावली. कुठे जाणे नाही न् येणे नाही. सगळे कसे बदलुन गेले किती दिवसांनी जिवलग भेटणे. ते भेटतानाहि काहीसा तणाव, तोंडाला मास्क हातात सॅनेटायझर, दुरचे अंतर, मनमोकळी मैफील अशी नाहीच. परंतु एकमेंकाना भेटणे न् संवाद करणे नसे थोडके. तसं पाहिले तर दर आठवडा मुंबई देवळाली प्रवास २६ वर्ष सुरु होता. आता तो जवळपास थांबला आहे. अधुनमधुन जाणे येणे राहिल. तसा फोनवरुन संपर्क आहे. पण त्या मैफिली न् गप्पा. मंत्रालयात काम करण्याची काही औरच मजा. ती अनुभवणे तसे दुर्मीळ, गावगाडा काही कमी नाही. त्यात रमणे हा एक वेगळा अनुभव आहे.

नगरपरिषदेची निवडणुक जवळ आल्याने कलगीतुरे रंगु लागले आहेत. ते आणखीनच रंगत जातील. काल आणी आज सत्तारुढ गटाने केलेले विकासकामाचे उद्घाटन व सकाळीच त्यासाठी प्रयत्न करणा-या दुस-या गटाने केलेले औपाचारीक लोकार्पण चांगलेच गाजते आहे. सोशल मिडिया हातात असल्याने एक गट त्यावर सक्रिय तर सत्तारुढ पत्रकार मित्रांचे दृष्टीने दखलपात्र असल्याने त्याच्या ठळक मथळ्यात बातम्या आल्या. त्यांची कात्रणे फिरत फिरत आमचेकडे आली. काहींनी फोन केले. यावर माझे मत जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. या बातमीत पावसाळयात उगवणा-या भुछत्र्यां म्हणुन विरोधकांचा केलेला उल्लेख सत्तारुढ गटांचे समर्थकांना गुदगुल्या करणारा. तर विरोधी गटांत चला आपली दखल विरोधक म्हणुन घेतल्याचे समाधान.

भुछत्र हा शब्द अस्मादिकांनी सहज गुगलवर टाकला, नेमके हे भुछत्र तरी काय आहे.तुम्हीहि टाकुन पहा. काय अफलातून माहिती आली समोर. तुम्ही खाता मशरूम पण भुछत्रच बरं का. किती प्रकार एक ना अनेक. त्याची लागवड करुन परदेशात निर्यात करत असल्याचे वाचण्यात आले. त्यात एक भुछत्र तर अंधारात चमकते, कालव्यासारखे, दिप्तीमान भुछत्र. अंधार झाला पणती जपुन ठेवा. नाही बनता आले पणती तर भले कुणी काही म्हणो भुछत्र तरी बना. तेवढाच उजेड अंधारात. हि माहिती देत आहे सोबत पहा देवळालीकरांनो नेहमीची तोट्याची पारंपरिक पिके घेवुन भ्रमनिरास होण्यापेक्षा एकदा या भुछत्रांना तुमच्या वावरात लागवडीला संधी द्या. काय फायदा होतो का तोटा एकदा अजमावून पहा.

दत्तात्रय कडू पाटील

देवळाली प्रवरा हेल्प टीम

Related Articles

Back to top button