गुन्हे वार्ता

भुरट्या चोर्या म्हणता म्हणता लाखोंच्या चोर्या…

आरडगाव आटोळे वस्तीत गाय व कालवडीची चोरी…

आरडगांव/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील आरडगांव (आटोळे वस्ती) येथील प्रकाश माधवराव आटोळे या शेतकऱ्याची गाय व कालवड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि आरडगांव येथील शेतकरी प्रकाश माधवराव आटोळे यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यातून रात्री १२ ते ३ या सुमारास ४० हजार रुपये किंमतीची साडेचार वर्षाची काळ्या व पांढ-या रंगाची शिंगे असलेली जरसी होस्टेन जातीची गाय व दोन वर्षाची काळ्या व पंढ-या शुभ्र रंगाची जरसी होस्टेन कालवड (गाय) अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याने येथील शेतकरी प्रकाश आटोळे यांनी याबाबत राहुरी पोलिसात गुन्हा रजि कलम 938/2021 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोदणी केला आहे.
राहुरी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ठाणे अंमलदार आर. जी. गायकवाड हे करीत आहे.

राहुरी तालुक्याच्या पुर्वभागात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गाया, म्हशी, शेळ्या, बोकडे, कोंबड्या, विद्युत मोटारी, केेबली, चार चाकी गाड्या, मोटर सायकली, यासारख्या चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने त्याचा बंदोबस्त करावी अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

Related Articles

Back to top button