अहमदनगर

भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान – पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी

राहुरी शहर/अशोक मंडलीक : भारतीय संविधान दिना निमित्त नुतन मराठी शाळा क्रमांक १, राहुरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मनोगत व्यक्त करताना पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले की, संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य याचे पालन करावेे, भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भागीरथी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या देशभक्ति पर गायनाने झाली. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार दुशिंग, बार्टी चे दिलावर, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव अप्पासाहेब मकासरे, स्मारक समितीचे मधुकर साळवे, पत्रकार मनोज साळवे, कन्या विद्यालयाच्या मुख्यध्यापिका शेंडगे तसेच उर्दू विद्यालयाच्या नजमा मॅडम, शिंदे सर, प्रविण ठुबे, महेश साळवे आदि उपस्थिति होते.
संविधान दिना निमित्ताने विद्यार्थींनी भाषण तसेच रांगोली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कांबळे यांनी कार्यक्रमाची व संविधान दिनाची माहीती दिली. अप्पासाहेब मकासरे यांनी संविधान सप्ताह निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहीत देऊन मनोगत व्यक्त केले. राजेंद्र वाडेकर, बार्टी चे दिलावर, मधुकर साळवे व बार्टी चे एजाज पिरजादे आदीनी मनोगत व्यक्त केलेे. कार्यक्रमा दरम्यान पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करणयासाठी बार्टी चे एजाज पिरजादे, महेश साळवे, प्रणय कोरडे, राहुल चंदनशिव, सार्थक भागरेे, रूतिक जाधव, सूरज विटणोर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक मनोज साळवे तर आभार मनीषा भोजने यांनी केले.

Related Articles

Back to top button