महाराष्ट्र

भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधात बीड बंद मध्ये सहभागी व्हा- नागेश मिठे पाटील

बीड प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याने या क्रुर कृत्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तरी या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून संपुर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांनी या बंद मध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन काँग्रेस चे बीड जिल्हाउपाध्यक्ष नागेश मिठे पाटील यांनी केले आहे.


उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणार्या शेतक-यांना भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. देशातील शेतक-यांवर भाजपच्या केंद्र सरकारकडून व भाजपा शासित राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय, अत्याचार होत आहेत.

भाजप सरकारचे हे कृत्य हिटलर व मुसोलीनीलाही लाजवेल अशा प्रकारचे असून लखीमपूर खिरी येथील शेतक-यांना सामुहिकरित्या ठार मारण्याची घटना जनरल डायरने केलेल्या हत्याकांडांची आठवण करून देणारी आहे. या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठविणार्या काँग्रेसच्या नेत्या श्रीमती प्रियंकाजी गांधी यांना तुरुंगात डांबून इंग्रज राजवटीचा परिचय भाजप सरकारने करुन दिला आहे. अशा या क्रूर अत्याचारी भाजप सरकार विरोधात संपूर्ण देशभर आंदोलने सुरु आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सोमवार, दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button