अहमदनगर

भाजपाच्या जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अहमदनगर येथे बैठक संपन्न

बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट करून उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
अहमदनगर/ जावेद शेख : अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी प्रामुख्याने गावपातळीवर सध्या निर्माण झालेल्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधला आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वांची मतेही जाणून घेतली. 
याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, शिवाजीराव कर्डीले, आ. सौ. मोनिका राजळे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, प्रा. भानूदास बेरड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, अरूण मुंढे, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, अहमदनगर शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे, दिनकर, सुवेंद्र गांधी, सचिन तांबे, सर्व तालुकाध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button