महाराष्ट्र

“शिवाजी” द किंग ऑफ इंडिया- शिवचरित्रकार हसन सय्यद

अहमदनगर/ जावेद शेख : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील ह.भ. महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या मूकीनंदपूर श्रीराम साधना आश्रम येथे शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ रोजी, सांय, ७:०० वा राहूरी कारखाना येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार यांचे शिवचरित्र व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान परिसरातील अनेक भाविकांनी, शिवप्रेमींनी व त्रिमूर्ती संकुलचे शिक्षक व विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचे लाभ घेतले.
यावेळी महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले व म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र लोकांपुढे जाणे खूप गरजेचे आहे, जेणे करून समाजात एकता व अखंडता नांदली पाहिजे आणि श्री हसन सय्यद यांच्या माध्यमातून शिवरायांचे विचार महाराष्ट्रातील संपूर्ण लोकांपर्यंत पोहचत आहे हे खूप मोठे कार्य आहे, समाजात एक आदर्श व महान कार्य करून आपण प्रबोधन करत आहात हिच खरी राष्ट्र भक्ती होय.
शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी व्याख्यानात बोलताना म्हणाले की, विश्ववंदनीय छत्रपती शिवराय हे हयात असल्यापासून विश्वला वंदनीय आहे. १७ व्या शतकात युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचे आघाडीचे वृत्तपत्र होते. जेव्हा महाराज आग्र्याहून सही सलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती. आणि त्यात महाराजांचा ‘शिवाजी’ द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख केला. शिवाजी महाराजांची विजयाची नोंद साक्षात गिनीज बुकने देखील घेतली, म्हणजे महाराज हयात असतानाच देशाचे राजे होते व विश्ववंदनीय हे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा मध्ये ‘वर्धिष्णू विश्व वंदिता’ यात स्पष्ट होते, म्हणून महाराजांचे विचार हे येणाऱ्या काळातही युवकांना प्रेरणाश्रोत आहेच.
शिवछत्रपतींनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज्यातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला म्हणजेच अठरा पगड जाती धर्माला नवसंजीवनी दिली. रयतेचे राजे शिवरायांनी स्वताच्या धर्माचे रक्षण करून दुसऱ्याच्या धर्माचे सुद्धा संरक्षण केले. शिवरायांच्या स्वराज्यात हिंदू, मुस्लिम, ब्राम्हण, बौद्ध, हरीजन, न्हावी, कुंभार, चाभार, वडार, तेली, माळी, सर्व समाज बांधव होते. सर्वांना समान वागणूक होती. तसेच आपल्या भारत देशाला महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याला एकत्र येऊन आपआपसातील मतभेद विसरून मंदिर मशिद हे आमचे अस्मिता जरी असेल तरी त्या व्यतिरिक्त देशाच्या हितासाठी व येणारी पिढी सक्षम बनविण्यासाठी देशातील प्रत्येक शहरात भव्य अभ्यासिका दालन उभारून त्यांना योग्य दिशा देण्याची सध्या काळाची गरज आहे.
भारत माझा महान देश आहे परंतु आपणच आपापसात वाद करत राहिलो तर चीन व पाकिस्तान सारखे देश यांचा फायदा घेण्यास तयारच बसलेत म्हणून शिवकालीन शिवसृष्टी अवतरणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी केले. दरम्यान शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी साल्हेर किल्ल्याचे युद्ध कवी भूषण यांच्या काव्यच्या माध्यमातून त्यांच्या अनोख्या शैलीत मांडून वर्णन केले व शिवरायांच्या चरित्र सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांची कन्या खुशी हसन सय्यद हिने देखील परखडपणे शिवरायांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले. दरम्यान उपस्थित श्रोत्यांनी व व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नेवासा मुकीनंदपूर येथील श्रीराम साधना आश्रमचे ह.भ.प महंत सुनिलगिरीजी महाराज, महंत गोपालगिरीजी महाराज, महंत सिध्दनाथ महाराज, शिवशाहीर कोलते, त्रिमूर्ती संकुलचे प्राचार्य सोपानराव काळे, उपप्राचार्य चव्हाण, सरपंच योगेश म्हस्के, औरंगाबादचे शिवसेना पदाधिकारी दरेकर, नेवासा शिवसेना तालुकाउपाध्यक्ष म्हस्के, भाजपा नेवासा महिला शहराध्यक्षा स्वातीताई पवळे, पी.आर जाधव, प्रतापराव कोलते, दहेगाव-ने येथील आरेश पठाण, खोसपुरी येथील आसिफ पठाण, सतिष महाराज धनगर, पत्रकार बाळासाहेब पिसाळ, कार्यक्रमासाठी अन्नदान  संंदिप ताकपेरे व परीवार यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय पार्वती बाई रामभाऊ शेळके यांच्या पुण्यस्मरणा निमित्ताने श्री. शेळके कुटूंबाने केले, व नियोजन नेवासा येथील शिवगर्जना उत्सव समिती हे कार्यास तत्पर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.कॉ. संजुबाबा गायकवाड यांनी केले.

Related Articles

Back to top button