अहमदनगर
ब्राह्मणी येथे प्रहार दिव्यांग संघटनेची स्थापना
अहमदनगर /जावेद शेख : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे प्रहार दिव्यांग संघटनेचा फलक लावून शाखा उद्घाटन करण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांच्या हस्ते शाखा उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी पंचायत समितीचे सदस्य सुरेश बनाकर हे होते.
प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. यावेळी घाडगे यांनी सांगितले की, राहुरी तालुक्यात गेली दहा वर्षापासून दिव्यांगांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम प्रहार दिव्यांग संघटना करते आहे. तसेच दिव्यांगाच्या अडचणी सोडवण्याचे काम करते. ही संघटना राजकीय नसून फक्त दिव्यांगाना शासनाच्या योजना, त्यांचे हक्क मूलभूत सोई मिळण्यासाठी राहुरी तालुक्यात वेगवेगळे शिबिर राबविण्यात येतात. या पुढे हे काम मोठ्या प्रमाण उभे राहण्यासाठी राहुरी तालुक्यात आज पर्यत दहा शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत. ब्राम्हणी शाखेचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव शिंदे व उपाध्यक्ष साहेबराव हापसे यांना दिव्यांगांसाठी काम करण्याची इच्छा असल्याने ही निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पोकळे बोलताना म्हणाले की, संघटनेचे नगर जिल्ह्यात सर्वात चांगले काम राहुरी तालुक्यात चालू आहे. राहुरी तालुक्याचे अनुकरण करून इतर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करणे गरजेचे आहे. सुरेश बानकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, दिव्यांग संघटनेचे चांगले काम आहे. 5% निधी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी खर्च करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. सर्व राजकीय पक्षाचे सहकार्य निश्चित घ्यावे, परंतु कुण्या एका राजकीय पक्षाची बाजू घेऊन काम करू नये. संघटनेला काहीही मदत लागो, कधीही हाक मारा, आम्ही सहकार्य करू. यावेळी सुञसंचालन प्रहारचे जिल्हा समन्वयक आपासाहेब ढोकणे यांनी केले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महानुर, अहमदनगर शहराध्यक्ष संदेश रपाडीया, जिल्हा सचिव हमीदभाई शेख, जिल्हा संघटक आप्पासाहेब गाडे, जिल्हा समन्वयक किशोर सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, राहुरी तालुका सचिव योगेश लबडे, देवळाली प्रवरा उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव सुखदेव कीर्तने, टाकळीमियॉ शाखाध्यक्ष ह.भ.प. नानासाहेब शिंदे महाराज, उपाध्यक्ष सुरेश दानवे, कार्याध्यक्ष संघटक कांगळे, माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव, उपाध्यक्ष जगन्नाथ हापसे, गोटुंबा आखाडा शाखाध्यक्ष दत्तात्रय खेमनर, उपसरपंच राहुरी खुर्द तुकाराम बाचकर, वांबोरी शाखाध्यक्ष शशिकांत कुर्हे, मांजरी शाखा अध्यक्ष सागर मकासरे, कृष्णा लुटे, बाबासाहेब सञे, अशोक देशमुख, अभिजित हापसे, प्रभाकर हापसे, मानिक तारडे, रामदास साठे, संदिप बल्लाळ, भास्कर दलंदरे, राजु चादघोडे, प्रतिक बानकर, मनोज हापसे, संजय गोरे, गौरव वैरागर, पिंप्री अवघड शाखाध्यक्ष रामभाऊ पटारे, फकीरचंद लांबे, आनिस शेख, सौ.नंदा वैरागर, रोहित कुंभकर्ण, वसीम शेख आदि उपस्थित होते. तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे यांनी आभार मानले.