औरंगाबाद

बोकुड जळगावच्या तत्कालीन ग्रामसेवकासह एकावर गुन्हा दाखल; नमुना नं. ८ च्या नकलेत अफरातफर

पैठण/ विलास लाटे : मौजे पाटोदे वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील भूखंडाचे क्षेत्रफळ बेकायदेशीर वाढविल्याप्रकरणी पैठण न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधीत आरोपींवर विवीध कलमान्वये नुकताच बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोकुड जळगाव ग्रामपंचायत हद्दीतील घर मिळकत क्र. २६ चे तुळशीराम हिरामण गांगे यांच्या नावे ३६० चौरसफूट क्षेत्राचे मालक असताना ग्रामपंचायतने १६ सप्टेंबर २०१३ रोजी ग्रामसेवक कैलास जनार्दन गायकवाड व रोहिदास तुळशीराम गांगे यांनी संगनमत करुण घर मिळकत क्रं. २६ चे क्षेत्र ६६० चौरसफूट करुण घेतले.

या जागेची नमुन नं. ८ ची नक्कल तयार करून त्याआधारे खरेदीखतही केले. ही बाब निदर्शनास आल्यावर तक्रारदार सुरेश काशिनाथ ढोले यांनी ॲड. विजयकुमार जी. मुळे, ॲड. सचिन पाटील व ॲड. आरती राका पैठण यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. पैठण न्यायालयाच्या आदेशावरून बनावट न. नं. ८ ची नक्कल तयार करुण खरेदिखत केल्याप्रकरणी आरोपींवर बिडकीन पोलीस ठाण्यात सीआरपीसी प्रमाणे भादंवि कलम ४२०, ४६४, ४६६, ४७१, १६६, १६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार जगदिश मोरे व पोलीस कर्मचारी करत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button