अहमदनगर

बारागाव नांदूर येथे रिपब्लिकन सेना शाखेचे उद्घाटन

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील बारागाव नांदूर येथे 5 ऑक्टोबर 2021 रोजी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख राजू आढाव यांच्या हस्ते फीत कापून शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका प्रमुख चंद्रकांत जाधव होते.
यावेळी जिल्हा उपप्रमुख भरतजी भांबळ, गंगानाना विधाटे, अपंग सेलचे जिल्हाप्रमुख रोहीदास अडागळे, तालुका कार्याध्यक्ष नंदूभाऊ साळवे यांचे भाषणे झाली. शेवटी जिल्हाप्रमुख राजू आढाव यांनी त्यांच्या भाषणात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार हे सभागृहात निवडून गेल्यावर दलित, आदिवासी, मागासवर्गीय मुस्लिम यांच्या प्रश्नावर एक ब्रशब्द ही काढत नाही की वाड्या वस्त्यांवर ढुंकूनही बघत नाही. येत्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्यायची रिपब्लिकन सेना ही शिक्षण आरोग्य रोजगार प्रत्येक कार्यालयात बोकाळलेला भ्रष्टाचार यावर आवाज उठवणार असून शासनाच्या योजना गोरगरिबांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा प्रमुख राजू आढाव यांनी सांगितले.

यावेळी शाखाप्रमुख अंजुमभाई पटेल, उपप्रमुख योगेश जगधने व इतर बहुजन समाजातील अनेक तरुणांनी संघटने मध्ये प्रवेश केला.

Related Articles

Back to top button