औरंगाबाद

बनावट उतारे तयार केल्याप्रकरणी ग्रामसेवकांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करा

पैठण दिवाणी न्यायालयाचे आदेश

विलास लाटे /पैठण : तालुक्यातील बिडकीन ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने येथील सरकारी जमीनीचे बनावट आठचे उतारे बनवून दिल्याप्रकरणी पैठण दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सदर ग्रामपंचायतीच्या दोन ग्रामसेवकांसह मंडळाधिकारी व अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिक माहिती अशी की, बिडकीन येथील शेख सरदार शेख उस्मान यांनी येथील सरकारी जमीन गट नं.५८७ मधील भुखंडाची ग्रामसेवक भास्कर साळवे, देविदाम डेपले यांनी मंडळाधिकारी यांना हाताशी धरून शेख मकबुल शेख अजीज, शेख अहमद शेख उस्मान, शेख वाहेद शेख हय्युम, शेख नसिर शेख इब्राहिम यांच्या नावे बेकायदेशीर नमुना नंबर आठवर नोंद करून बोगस नमुना नंबर आठचे उतारे दिले असल्याचा आरोप करत याप्रकरणी संबंधितांवर शासकीय जमीन हडप करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करत फसवणूक केली असल्याचा ठपका ठेवत याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी अॅड. विजयकुमार मुळे यांच्या मार्फत पैठण दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अॅड. मुळे यांनी सुनावणी दरम्यान युक्तिवाद करत सदर भुखंड हा बिडकीनचे तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, जिल्हाधिकारी, तहसिलदार व इतर कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी सदर लोकांना शासना मार्फत भुखंड दिलेला नसतांना सुध्दा संबंधीत ग्रामसेवक भास्कर साळवे यांनी बेकायदेशीर फेरफारा अन्वये सदर लोकांचे नाव ३३ बाय ३३ फुटांच्या हद्दीपर्यंत नमुना नं.८ चे उतारे २०१०-११ मध्ये तयार केले व तत्कालीन ग्रामसेवक देविदास ढेपले यांनी १०८९ चौ.फु. जागेच्या ऐवजी २१७८ चौ.फु. चे चुकीचे नमुना नं.८ ची नक्कल, जागा दुपटीने वाढवून तयार करुन दिली. सरकारी जाग्याचे बेकायदेशीररित्या बनावट नमुना नं.८ च्या नकला तयार करुन व त्यावर चुकीचे क्षेत्रफळे दाखवून शासनाचा भुखंड हडप करण्याचे काम केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

याप्रकरणी पैठण न्यायालयाचे न्यायाधिश श्री. वाघ यांनी मंडळाधिकारी, ग्रामसेवक साळवे, डेपले सह अन्य चौघांवर कलम १५६ (३) सी.आर.पी.सी. अन्वये शासनाची व जनतेची फसवणूक केल्याबाबतचे व सरकारी कर्मचारी यांनी बनावट दस्ताऐवज केल्यामुळे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा अहवाल न्यायालयात दाखल करण्याचे आदेश बिडकीन पोलीसांना दिले आहे.
        

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button