अहमदनगर
फुटलेले बंधारे तातडीने दुरुस्त करा : पालवे
पाथर्डी प्रतिनिधी : तालुक्यातील कोल्हार सह चिचोंडी परिसर गावे तसेच सुसरे कोरडगाव, निपाणी जळगाव, भिलवडे, दैत्यानांदुर व इतर तालुक्यातील गावातील फुटलेले जवळपास 40 पेक्षा अधिक बंधारे तातडीने उपाय योजना करुन दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगरच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन देत केली असल्याची माहिती जय हिंदचे शिवाजी पालवे यांनी दिली आहे.
पालवे यांनी कोल्हार येथील बंधारेची पहाणी केली असुन तालुक्यातील सुसरे कोरडगाव, निपाणी जळगाव, भिलवडे, दैत्यानांदुर व इतर तालुक्यातील गावातील बंधारे मुसळधार पावसाने फुटले आहेत. बंधारे फुटल्याने शेतीतून पाणी वाहत आहे. अनेकांच्या जमिनीचे देखील नुसकान झाले आहे. शेती मधील कांदे, बाजरी, असे अनेक पिकांचे नुसकान झाले आहे. पंचनामे चालु आहेत, नुसकान भरपाई मिळेल, अशी आशा आहे. फुटलेले बंधारे तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर बंधारेची पाहाणी करण्यासाठी अधिकारी पाठवूण उपाय योजना कराव्यात, जेणे करून पाण्याचा साठा राहील व बंधारेच्या शेजारच्या शेतकर्यांना जमीनीची मशागत करता येईल.
या निवेदनात जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्हा परिषद पाटबंधारे विभागास आदेश देवुन फुटलेले बंधारे दुरूस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे. पाहाणी प्रसंगी सरपंच शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, मा सरपंच बाबाजी पालवे, जय हिंद फौंडेशनचे शिवाजी पालवे, दिनकर गर्जे, आजिनाथ पालवे, दिनकर पालवे, प्रविण पालवे, सिदेश पालवे, विष्णु गिते, शरद पालवे, आजिनाथ पालवे उपस्थित होते.