अहमदनगर

प्रा. अनंत केदारे यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार प्राप्त

राहुरी / बाळकृष्ण भोसले – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार प्रा. डॉ. अनंत केदारे यांना प्रदान करण्यात आला. 
स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार योजनेअंतर्गत प्रौढ विभागातील उपेक्षितांचे साहित्य या साहित्य प्रकारातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ‘वाग्दान’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार त्यांना प्रतिनिधीमार्फत घरपोच प्रदान करण्यात आला. सध्या ते सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे हिंदी भाषेतही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रा. केदारे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button