अहमदनगर

राहुरीतील १३४ बालकांच्या बाल संगोपन योजनेला मंजुरी – आप्पासाहेब ढुस

राहुरी प्रतिनिधी : राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात तालुक्यातील १३४ बालकांना बाल संगोपन योजना मंजूर करण्यात आल्याची माहिती कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज ढुस यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या विनंतीवरून राहुरी तालुक्यातील कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राहुरीत शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये तालुक्यातील १३४ बालकांना बाल संगोपन योजना मंजूर करण्यात आली आहे. बाल संगोपन योजना मंजूर केेेेल्याबद्दल कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीने जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनिफ शेख व टीमचे आभार मानले आहे.

आज आयोजित करण्यात आलेल्या शिबिराची माहिती मिळू शकली नाही व ज्यांचे कागदपत्र पूर्तता होऊ शकली नाही अश्या तालुक्यातील उर्वरित बालकांसाठी पुन्हा राहुरीमध्ये शिबीर आयोजित करण्याबाबत जिल्हा बाल कल्याण समितीला कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब भिमराज ढुस व प्रशांत सुधाकर कराळे यांनी लेखी पत्र देऊन मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button