महाराष्ट्र

प्रवरेचा भारतीय ऊस संशोधन उपकेंद्रा सोबत शैक्षणिक करार

प्रवरानगर/प्रतिनिधी : लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषद-भारतीय ऊस संशोधन व जैविक नियंत्रण प्रवरानगर या नामांकित उपकेंद्रा सोबत शैक्षणिक, संशोधन व विस्तार शिक्षण सामंजस्य करार झाला असल्याची माहिती ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश चंद्रे यांनी दिली. 
या सामंजस्य काराराद्वारे संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संशोधन, प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, विस्तार शिक्षण, अनुभवी शास्त्रज्ञ मार्गदर्शन यांविषयीच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ.डी.एन.बोरसे यांनी दिली.
या भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)- भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनौचे जैविक नियंत्रण उपकेंद्र, प्रवरानगर हे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात दिवंगत लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण पुरस्कारप्राप्त) यांच्या प्रयत्नाने एप्रिल, १९७८ मध्ये स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ते महाराष्ट्रातील उसाच्या किडी आणि रोगांच्या जैविक नियंत्रणाच्या विविध उपायांवर संशोधन व शेतकरी जागरूकतेसाठी प्रयत्नशील आहे. ऊस उत्पादकांना ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादकतेसाठी आधुनिक तांत्रिक बाबींचा अवलंबन सल्ला देण्यात केंद्राचा सक्रिय सहभाग आहे. ऊसावरील प्रमुख कीटक आणि रोगांचे सर्वेक्षण आणि निगराणी हा केंद्राच्या स्थापनेपासूनचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कीटकांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी बायोकंट्रोल एजंट्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि ऊस उत्पादकांना त्याचे वितरण करण्यात केंद्र सक्रियपणे सहभागी आहे.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध सामंजस्य काराराद्वारे ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषिचे आद्यवत व सखोल ज्ञान मिळावे या हेतूने यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.
यावेळी कारारावेळी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. बोरसे, डॉ.योगेश थोरात, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रोहित उंबरकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, प्रा.रमेश जाधव, प्रा.महेश चंद्रे, प्रा.रविंद्र दासपुते, प्रा.संतोष वर्पे यावेळी उपस्थित होते व प्रा.महेश चंद्रे, प्रा.रमेश जाधव यांनी सदर प्रक्रियेसाठी विशेष परिश्रम घेतले.
या कराराबद्दल लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, विश्वस्त आ.आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button