अहमदनगर

प्रवरा सहकारी दुध व्यवसायीक व कृषीपुरक संस्था पुनर्जीवित करा – आहेर

लोणी : प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांची प्रवरा सहकारी दुध व्यवसायीक व कृषीपुरक संस्था ही आपली कामधेनु असुन त्या संस्थेचे मृत स्वरुप पाहिल्यावर मनाला खुप वाईट वाटते. ही संस्था पुनर्जीवित करावी अशी मागणी रनजित आहेर केली आहे.
श्री आहेर पुढे बोलताना म्हणाले की, माझे वडिल या दुध संस्थेचे कर्मचारी होते. अनेक दिवस या दुध संस्थेच्या माध्यमातून माझ्यासह शकडो कुटुंबांचे घर, संसार, प्रपंच या संस्थेच्या माध्यमातून चालले. परंतु संस्था बंद पडल्यानंतर संस्थेच्या अनेक कामगाराचे वाटोळे झाले. त्यात अनेक कामगारांची संसार देशोधडीला गेले ज्याच्या जिवावर ही संस्था उभी होती त्या संस्थेच्या कामगारांना वार्‍यावर सोडले गेले.
परंतु आज योगायोगाने तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना. राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे दुग्धविकास मंत्री असल्याने ही संस्था पुन्हा एकदा उभी राहील अशी आशा परिसरातील सर्व कामगार व त्यांच्या कुटुंबासह दुधउत्पादक सभासदांना आहे. त्यांनी पुढाकार घेऊन ही दुध संस्था पुनर्जीवित करावी. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकिय श्री गणेशा या प्रवरा सहकारी दुध व्यावसायिक व कृषीपुरक संस्था मर्यादित या संस्थेचे संचालक म्हणून झालेला आहे.
आज शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाचा मोठा आधार आहे. ग्रामीण भागातील बहुतांश बेरोजगार युवक आज नोकर्‍यांच्या मागे न लागता दुध व्यवसायाकडे वळाला असुन त्या माध्यमातून आपली उपजीविका करत आहे. त्यामुळे प्रवरा परिसरातील दुधउत्पादक शेतकऱ्यांसाठी दुग्धविकास मंत्री महोदयांनी ही संस्था पुनर्जीवित करावी, अशी मागणी श्री आहेर यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button