अहमदनगर

माउली वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा आशीर्वाद मला लाखमोलाचे आहे-डॉ. दीपाली काळे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : श्रीरामपूर हे गुणी आणि सेवाशील माणसांचे आदर्श शहर असून या शहरातील सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पना वाघुंडे यांनी गेल्या चार वर्षापासून सुरु ठेवलेला माउली वृद्धाश्रम हे दुर्मिळ मानवसेवेचे आदर्श केंद्र असून माझ्या वाढदिवशी येथील ज्येष्ठांचा मिळालेला आशीर्वाद लाखमोलाचा असल्याचे भावपूर्ण उदगार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी काढले.

येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माउली वृद्धाश्रमात डॉ. दीपाली काळे यांचा वाढदिवस सेवाशील मदत कार्यातून साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी डॉ. दीपाली काळे बोलत होत्या. येथील माऊली वृद्धाश्रमात श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपालीताई काळे यांचा वाढदिवस सेवाशील उपक्रमाने साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक मनोगतातून वृद्धाश्रमतील कार्यपद्धती विशद करून डॉ. दीपाली काळे यांच्यासारख्या एका उच्च पदाधिकाऱ्याने वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करावा हे आम्हाला भूषणावह आणि प्रेरणादायी आहे. असे सांगून डॉ. दीपाली काळे यांनी दिलेला किराणामाल, फळे आणि भरपूर जीवनावश्यक वस्तू तसेच रुपये दहा हजाराची मदतीने आम्ही भारावून गेलो आहोत. सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी डॉ. दीपाली काळे यांचे औक्षण करून शाल, बुके देऊन सत्कार केला. तसेच डॉ. दीपाली काळे यांच्या सासूबाई रत्नमाला काळे, मुलगा ऋतिक काळे यांचाही सत्कार करण्यात आला. सुनील साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष वाघुंडे यांनी पोलीस अधिकारी राजू गोडगे यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. दीपालीताई काळे आणि सुनील साळुंखे यांचा पुस्तके देऊन सन्मान केलाराजेंद्र रासने, तुकाराम मोरे आदिंनी नियोजन कामात भाग घेतला. डॉ. काळे आपल्या मनोगतातात पुढे म्हणाल्या, वृद्धाश्रमातील वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मला आई, वडील यांचा आशीर्वाद वाटतो, असे म्हणून त्यांनी सर्व ज्येष्ठांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. सर्वांशी मनमोकळी चर्चा करून सांगितले की, लवकरच ज्येष्ठांच्या समस्यांची सोडवणूक केली जाईल. सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button