अहमदनगर

प्रभाग ४ मधील शिरसगावचा आठवडे बाजार पूर्ववत सुरु; पालिकेच्या नियमांची बाजारकरुंकडून पायमल्ली…

श्रीरामपूर[प्रतिनिधी] : शिरसगावचा बंद केलेला आठवडे बाजार प्रभाग ४ आशीर्वादनगर भागात भरायला लागला काही महिने प्रचंड गर्दीत चालू होता.कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व कॉलेजरोड या मुख्य रस्त्यावर भरत असल्याने रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण झाल्याने व अपघात होण्याची शक्यता असल्याने या भागातील अनेक तक्रारी तहसीलदार, प्रांताधिकारी व नगरपालिका व पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर मागील मंगळवारी नगरपालिका नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नगरपालिकेचे कर्मचारी पाठवून आठवडे बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे बाजारकरू यांनी आपली जागा बदलली व शिरसगाव इंदिरानगर रस्त्यावर पूर्ववत बाजार सुरु केला. या मंगळवारी नगरपालिकेच्या सूचनाला न जुमानता परत आशीर्वादनगरला दिवसभर पाउस असताना येथे बाजार भरला होता.


याबाबत या भागातील नगरसेवकांना चौकशी करण्यासाठी अनेक वेळा फोन लावला तर घेतला जात नव्हता. त्यामुळे येथील रहिवासी यांना समजत नव्हते की नगरपालिकेने परवानगी दिली की या बाजारकडे कोणी पहायचे नाही असे ठरविले की काय? सोशल डीस्टेन्स न पाळता बाजार भरतो, ग्राहक हेही आता काही होत नाही  कोरोना महामारीची भीती संपली या हेतूने बिनधास्त बाजारात येतात.


नगरपालिकेच्या मंडइचे नुतनीकरण पूर्ण झाले असल्याने भाजीपाल्याचे विक्रेते यांनी नगरपालिकेच्या रस्त्यावर बसू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी सूचना वृत्तपत्रातून दिलेली असताना त्याची कोणीही दखल घेत नाही तरी येथील नागरिकांची मागणी आहे की येत्या मंगळवारी बाजार भरण्या अगोदर तहसीलदार, प्रांताधिकारी, नगराध्यक्षा, नगरपालिका, पोलीस विभाग यांनी संयुक्त रित्या बाजार न भरणे साठी कारवाई केल्यास शासनाच्या कोणत्याही आदेशाची पायमल्ली होणार नाही व नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. तशा सूचना संबंधिताना देण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button