औरंगाबाद

पोलिस अधीक्षक निमीत गोयल यांची पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यास भेट.

फोटो : पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपन करतांना पोलिस अधीक्षक निमीत गोयल व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी.

विलास लाटे/पैठण : पोलिस अधीक्षक निमीत गोयल यांनी नुकतीच पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याला भेट देत, कामकाजाचा आढावा घेत त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. निमीत गोयल यांनी पोलिस ठाण्याची ईमारत व परिसराची पाहणी करत सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे यांच्याकडून सद्यस्थितीच्या कामकाजाची माहिती घेत आढावा घेतला.
दरम्यान पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी औद्योगिक वसाहत पैठण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलीस उपनिरीक्षक राहूल भदरगे, बिट जमादार राजेश चव्हाण, तुकाराम मारकळ, पोलीस नाईक गणेश खंडागळे, राजेंद्र जिवडे, विजय मोरे व राहूल बचकेसह आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button