औरंगाबाद

पैठण तालुक्यात ठिकठिकाणी कायदेविषयक शिबिर संपन्न

 

विलास लाटे/पैठण : तालुक्यात अनेक गावात नुकतेच राष्ट्रीय विधि सेवा व प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात वीधी सेवा समितीच्या कार्याबाबत जनजागृतीसाठी निर्देश प्राप्त झाले असल्याने औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच पैठण तालुका विधी समिति व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

न्यायाधिश एस. एम. भावसार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व न्यायाधीश व्ही. एस. वाघ व एस. आर. गुळवे, यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तयार करुन पैठण तालुक्यातील कातपुर वाहेगाव, इसारवाडी, ढोरकीन, आपेगाव, उचेगाव, नवगाव व टाकळी अंबड या गावामध्ये जाऊन कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमामध्ये नागरीकांना विधी सेवा समितीच्या कार्याविषयी माहितीपत्रक वाटप करण्यात आले. येत्या २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकअदालतीमध्ये समझोतायोग्य प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत असे आवाहनही करण्यात आले.

 या कार्यक्रमास ॲड. सय्यद, ॲड. एस. एल. जाधव, ॲड. एस. एस. जाधव, ॲड. व्ही. आर. चव्हान, ॲड. सी. आर. कुलकर्णी, ॲड. विजय मुळे, ॲड. वाकडे, ॲड.जी. एस. काकडे, ॲड.के. के. चव्हान, ॲड. गव्हाणे,ॲड.  पहिलवान, ॲड. पी. पि . काकडे, ॲड. खडसन, ॲड. उगले, ॲड. बोबडे, ॲड. नवले, ॲड. मिसाळ, ॲड. औटे, ॲड. सोनवणे व ॲड. जोशी  व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button