कृषी

पेरू पिकाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या बैठकीत शास्त्रज्ञांकडून शेतकर्यांना मार्गदर्शन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील आखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्पाच्या पेरू पिकावरील शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाची बैठक राहाता तालुक्यातील एकरुखे येथे संपन्न झाली. प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सतीश जाधव यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना पेरू पिकासाठी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्याचा उद्देश व त्याच्या उपयोगाविषयी स्पष्टीकरण केले.
कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे यांनी पेरू लागवडीविषयी माहिती देतांना सध्या पेरू पिकावर स्केल किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच फळमाशी, मिलीबग, सुत्रकृमी व देवी रोगाची समस्या शेतकर्यांना भेडसावत असल्याचे सांगितले. डॉ. विकास भालेराव आणि डॉ. रणजीत कडू यांनी या किडरोग समस्यांवर मार्गदर्शन करताना एकात्मिक किड व रोग व्यवस्थापनावर माहीती देवून त्यामध्ये मशागती, भौतिक, जैविक व गरज पडल्यास रासायनिक पध्दतीचा वापर तसेच मित्र किडींचे व परागीभवन करणार्या मधमाशीचे संवर्धन करण्याविषयी सविस्तर माहिती दिली.
या बैठकीसाठी ताकुका कृषि आधिकारी श्री. शिंदे तसेच एकरुखे व राहाता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. डॉ. कडू यांनी आभार मानले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष संदीप टिळेकर यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button