शिक्षणवारी ज्ञान पंढरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला राहुरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कृषिभूषण सुरसिंग पवार हे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहीरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रबोधनकार ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजातील अनिष्ठ रूढी व परंपरा यांचा समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने काय अनिष्ट परिणाम होतो व त्यावर काय उपाययोजना केल्या याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. मनोज गुड, डॉ. आनंद चवई, प्रा. किर्ती भांगरे, सौ. अंजली देशपांडे, सौ. वैशाली पोंदे, सौ. सासवडे, अमृत सोनवणे व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सखेचंद अनारसे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button