अहमदनगर

मुळानगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : तालुक्यातील मुळानगर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामपंचायत महिला सदस्या मुन्नाबाई राजेश परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक नेते प्रवीण लोखंडे यांनी शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले. यावेळी विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. गुरूकुल क्लासचे विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सलीमभाई शेख तसेच सामाजिक नेते प्रवीण लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका त्रिभुवन, आदिवासी नेते दिलीप बर्डे, शालेय व्यावस्थापन समिती अध्यक्ष सुनील माळी, शाळेचे शिक्षक दरेकर, शक्तीलाल गंगे, हर्षद बिराडे, साहिल शेख, सुमित पलघडमल, सादिक शेख, बाळाभाऊ जाधव, विजू माळी, कैलास बर्डे, जालिंदर गायकवाड, राजेश परदेशी, नागेश पवार, आदेश हाके, आकाश बिराडे, पृथ्वी मनतोडे, अन्सार पठाण, मझहर मडकेश्वर, शुभम त्रिभुवन, किशोर पवार, वसंत यादव, संगम परदेशी, धनु पाटोळे, कटप्पा टकाळी, समीर गायकवाड, मोरे, अंगणवाडी सेविका देठेे,मदतनिस शेख, आरोग्य सेविका अलका गायकवाड, आयेशा शेख, पवार आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button