अहमदनगर

पाथरे शिवारात वीज कोसळून शेतमजूर गंभीर जखमी ; रोहित्र जळून खाक

आरडगाव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील पाथरे शिवारात शेतमजुरांच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाले आहे तर रोहित्रावर वीज पडल्याने जळुन खाक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव या शेतकऱ्याच्या शेतात कापूस वेचणी करणाऱ्या बारा कामगारांपैकी मानोरी येथील शब्बीरभाई जानूभाई पठाण, हिराबाई रामदास बाचकर या दोघांच्या अंगावर शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भोकराच्या झाडाखाली पाऊस आल्यानंत्तर बारा शेतमजूर बसले असता त्यातील शब्बीरभाई यांच्या पाठीला व पायाला गंभीर जखमा झाल्या. हिराबाईच्या अंगावर लोळ उडाले. त्यांना श्रीरामपूर येथे संजीवनी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत कामगार तलाठी सुवर्णा शिंदे व पोलीस पाटील दादासाहेब पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेची माहिती राहुरी तहसिलदारांना देण्यात आली आहे. याच बरोबर खुडसरगाव गावठाणात वीज पडल्याने रोहित्र जळून खाक झाले. या दोन घटना काल शनिवारी दुपारी घडल्या. मागील आठवड्यातील बुधवारी पाथरे येथील एकोतात्या रोहित्र वीज पडल्याने जळून खाक झाले.

Related Articles

Back to top button