महाराष्ट्र

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जात प्रमाणपत्र वाटप

जळगाव प्रतिनिधी : येथील कुसुम्बा गावातील ४० वंचित वडार समाजातील नागरिकांना पंचायत समितीचे माजी सभापती नंदु पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जातीचे प्रमाणपत्र मिळाल्याने न्याय मिळाला आहे.
   सविस्तर वृत्त असे की, कुसुम्बा गावात राहत असलेल्या वडार समाजास आजपर्यंत कोणतेही जातीचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. आज या समाजातील नागरिकांना पंचायत समितीचे माजी सभापती नंदु पाटील यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे समाजातील ४० नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. याकामी नंदू पाटील यांना प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्कल भाऊसाहेब, तलाठी आदी अधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पालकमंत्री तसेच महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख हर्षल माने, पंचायत समिती माजी सभापती नंदु पाटील, शिवसेना जिल्हा युवक प्रमुख शिवराज पाटील, कुसुबाचे प्रवीण पाटील, चिंचोलीचे केतन पोळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button